सकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंतच कडक होतेय? 'या' Tips वापरून तर पाहा

अनेकदा कॅसरोल मध्ये ठेवलेल्या पोळ्या/ चपात्या कडक होतात. त्यामुळे त्या खातानाही काही मंडळी नाकं मुरडतात.

कडक पोळ्या खायला लहान मुलं आणि वयोवृद्धांनाची त्रास होतो. अशा वेळी काय करायचं? तर, आजीबाईंचा 'हा' उपाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

पूर्वी आपल्या आजीने केलेल्या पोळ्या दिवसभर मऊ रहायच्या. ती नेमकी काय करायची? पाहा Tips

गरम पाणी-

कणिक मळताना गरम पाण्याचा वापर करा. यामुळे तुमची कणिक पुरेश्या प्रमाणात मऊ राहिल आणि पोळ्या मऊसुत होतील.

विश्रांती द्या-

सुरूवातीला कणिक हलक्या हातानं मळुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये जागा करून पाणी घालून थोडा वेळ ठेऊन द्या. काही वेळाने परत कणिक व्यवस्थित मळुन नंतर पोळ्या करा.

झाकून ठेवा-

कणिक मळुन झाल्यानंतर थोड्या वेळासाठी झाकून ठेवा. यामुळं तुमच्या पोळ्या कायम मऊ होतील.

शेकताना घ्या काळजी-

पोळी शेकताना गॅसच्या फ्लेमकडे म्हणजेच आचेवर विशेष लक्ष द्या. ना खुप कमी ना खुप जास्त, पोळ्या नेहमी मध्यम आचेवर शेका.

तूप किंवा तेलाचा वापर-

कणिक मळताना त्यात थोडेसे तेल किंवा तूप नक्की घाला. त्यामुळं पोळ्या खुप मऊ होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story