हिवाळा सुरु झाला की तुमचे ओठ फुटू लागतात. कधी कधी तर रक्त निघू लागतं. तर फॉलो करा या टिप्स
देशी गाईच्या तूपात हळद मिक्स करुन ती लावली तर त्यानं ओठ मऊ राहतील.
कोरफडमध्ये एन्जाइम मोठ्या प्रमाणात असतात. त्यात अनेक एक्सफोलिएटिंग गुण असतात. ते लावल्यानं ओठांना आराम मिळतो.
ओठ मऊ हवे असतील तर काकडी ओठांवर ठेवा.
एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब जल मिक्स करून ते ओठांवर लावा. त्यानं ओठ फाटणार नाहीत.
महत्त्वाचं म्हणजे ओठ फुटण्याचं एक कारण पाणी कमी पिणं आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)