IPL ऑक्शनमध्ये 'हे' स्टार खेळाडू राहिले Unsold, कोणी एक रुपयाही लावला नाही

Pooja Pawar
Nov 26,2024


आयपीएल च्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडलं.


यंदाच्या ऑक्शनमध्ये एकूण 182 खेळाडूंवर 639. 15 कोटी रुपये खर्च करून फ्रेंचायझींनी त्यांना आपल्या संघात जोडले.


परंतु जवळपास 19 स्टार खेळाडूंवर कोणी एक रुपयाही न लावल्यामुळे ते ऑक्शनमध्ये Unsold ठरले.

पृथ्वी शॉ :

पृथ्वी शॉ हा मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मात्र त्याला सीरिज करण्यात आलं. पृथ्वीची बेस प्राईज 75 लाख असूनही त्याला कोणीही खरेदी केले नाही.

शार्दूल ठाकूर :

लॉर्ड ठाकूर नावाने प्रसिद्ध असलेला शार्दूल 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये आला होता. मात्र त्याला कोणीही खरेदी केलं नाही.

पीयूष चावला :

पीयूष चावला हा मुंबई इंडियन्सचा हक्काचा गोलंदाज होता. मात्र 50 लाख बेस प्राईज असताना देखील कोणीही त्यावर बोली लावली नाही.

सरफराज खान :

टेस्ट क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सरफराज खानवर मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती. परंतु 75 लाखांची बेस प्राईज असताना देखील त्याला खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही.

उमेश यादव :

उमेश यादव हा आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. मात्र यंदा 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये आला होता, पण अखेर Unsold राहिला.

मयंक अग्रवाल :

मयंक अग्रवाल 1 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये आला होता. पण त्याला खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही.


डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यम्सन, टॉम करणं, जेम्स अँडरसन, टीम साऊदी, जॉनी बेअरस्टो हे दिग्गज खेळाडू यंदा ऑक्शनमध्ये Unsold राहिले.


तर अलेक्स कॅरी, आदिल राशिद, नवीन उल हक, मुस्तफिजूर रहमान फिन अॅलन, डिरेल मिचेल हे परदेशी स्टार खेळाडू सुद्धा स्टार आयपीएल ऑक्शनमध्ये Unsold राहिले.

VIEW ALL

Read Next Story