घराचा रंग सांगतो तुमचं व्यक्तिमत्व? तुम्ही भिंतींना कोणता रंग दिलाय?

घराला रंग देताना आपण प्रत्येकजण फार विचार करतो. पण तुम्ही कोणता रंग निवडता यावरुन तुमचं व्यक्तिमत्व समजतं.

Cool Tonned Colors

Mind Journal नुसार, जर तुम्ही निळा, जांभळा, हिरवा रंग निवडलात तर तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांच्यासाठी कंफर्ट, शांतता आणि आत्मशांती प्राथमिकता आहे. हे रंग इंद्रधनुष्यात खालच्या बाजूला असतात आणि आपल्या शांत, सुखदायक गुणांसाठी ओळखले जातात.

हे रंग जेव्हा रुममध्ये वापरले जातात तेव्हा ते शांत आणि निर्मळ वातावरण तयार करतात, जे दीर्घकाळ आराम करण्यासाठी उपयुक्त असतं. हे रंग आवडणारे इंट्रोव्हर्ट असतात.

Warm Tonned Colors

लाल, पिवळा, नारंगी आणि गुलाबी हे इंद्रधनुष्याच्या दिसणारे रंग ऊर्जने भरलेले असतात. हे रंग आनंद आणि मैत्रीशी जोडलेले असतात.

हे रंग स्वाभाविकपणे ऊर्जा दर्शवणारे असतात.

पांढरा रंग

पांढरा रंग आपला साधेपणा आणि शुद्धतेसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या पांढऱ्या आणि काळ्या रंगाला रंग मानलं जात नाही. ना ते इंद्रधनुष्यात दिसतात.

प्रकाश आणि स्पष्टता

पांढरा रंग प्रकाश आणि स्पष्टता यांचं प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग शांतता, स्वच्छतेशी जोडलेला आहे. जर तुम्हाला पांढरा रंग आवडत असेल तर तुम्हाला साधेपणा आवडतो.

Neutral Colors

तपकिरी, करडा आणि काळा हे आकर्षक रंग नसेल तरी त्यात एक साधेपणा आहे. हे रंग व्यवहारीपणा आणि आयुष्याशी संबंधित दृष्टीकोनाशी जोडलेला असतो.

व्यवहारिकता आणि तत्वं

व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं गेल्यास असे लोक हुशार असतात. जे विनाकारण खर्च करण्याऐवजी व्यवहारिकता आणि तत्वांना महत्व देतात.

VIEW ALL

Read Next Story