केक उरलाय?

सेलिब्रेशननंतर केक उरलाय? अशा पद्धतीनं स्टोअर करा, तीन महिने खराब होणार नाही!

केक संपला नाही?

एखाद्या प्रसंगी कापलेला केक संपला नाही की तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. मुळात केक फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तो कोणत्या प्रकारचा आहे हे पाहा.

फ्रेश क्रिम केक

फ्रुट केक किंवा फ्रेश क्रिम केक फ्रिजमध्ये ठेवावा. स्पाँज केकला याची गरज भासत नाही.

फळं, फुलं आणि क्रिमचा थर

केक फ्रिजमध्ये ठेवण्याआधी त्यावर सजावटीसाठी लावलेली फळं, फुलं आणि क्रिमचा थर हटवून तुम्ही तो फ्रिजमध्ये ठेवा. केक दीर्घकाळ टीकेल.

केकचे तुकडे करा

स्पाँज केक किंवा कमी क्रिम असणारा केक जास्त दिवस टीकवायचा असल्यास त्याचे तुकडे करून ते सिल्व्हर फॉईलमध्ये व्यवस्थित ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. केक बरेच दिवस टिकेल.

फ्रिजरमध्ये ठेवा

केक न कापता जर तुम्ही तो फ्रिजरमध्ये ठेवलात तर अगदी सहजपणे तो तुम्ही तीन महिन्यांसाठी टिकवून ठेवू शकता. पण, फ्रिजरमध्ये ठेवण्यापूर्वी तो व्यवस्थित झाकून घ्या.

पोकळी असणारं झाकण

फ्रॉस्टींगचा केक फ्रिजमध्ये ठेवायचा झाल्यास त्यावर पोकळी असणारं झाकण लावा. म्हणजे फ्रॉस्टिंग आणि केक खराब होणार नाही.

VIEW ALL

Read Next Story