घड्याळाच्या जाहिरातीमध्ये नेहमी 10 वाजून 10 मिनिटे झाल्याचे आपण पाहिले असेल.
कारण यावेळी घड्याळ सिमिट्रीकल दिसते.
मनोवैज्ञानिक दृष्टीने समरुपता दाखवली जाते.
लोकांना अशा गोष्टी पाहायला आवडतात, ज्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतील.
10.10 ही वेळ घड्याळात सर्वात संतुलित दिसते.
या वेळेत घड्याळात स्मायलीचा आकार दिसतो.
अगदी निरखून पाहीलं तर घड्याळ हसतंय असं वाटतंय.
यामुळे ग्राहकांना सकारात्मक संदेश जातो आणि जाहिरात सकारात्मक दिसते.
10.10 मिनिटाला V आकार दिसतो. जे विजयाचे प्रतिक मानलं जातं.