जगभरात डायबेटिजच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत अनेकजण या डायबेटिजच्या आजाराने त्रस्त आहेत.
डायबेटिजवर नियंत्रण मिळवायचं असेल तर औषधांसोबतच काही एक्सरसाइज सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा अशा 5 एक्सरसाइज आहेत ज्या केल्यास डायबेटिज कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
पोहणे या व्यायामामुळे तुम्ही फिट राहता तसेच रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सुद्धा हा व्यायाम उपयोगी ठरतो. नियमित पोहण्याचा व्यायाम केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
सायकल चालवल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. सायकलिंग ही एक कार्डियो एक्सरसाइज असून यामुळे डायबेटिज कंट्रोलमध्ये राहते.
डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज योगाचे विशिष्ट प्रकार करू शकता. योग्य केल्याने डायबेटिज कंट्रोलमध्ये राहतोच पण त्यासोबतच मानसिक ताण सुद्धा दूर होतो.
दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने डायबेटिजच्या रुग्णांची वाढलेली शुगर नियंत्रणात येऊ शकते. चालल्यामुळे डायबेटिजच नाही तर ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित होण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही डान्स वर्कआउट करू शकता. डान्सचे विशिष्ट प्रकार केल्याने हृदय निरोगी राहते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मात्र यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)