हिवाळा येताच सर्दी- खोकल्याचा त्रास मोठ्याप्रमाणावर होऊ लागतो.
तुम्हालाही खोकल्याची समस्या होत असेल, तर 'आलं' हा त्यावरील 'रामबाण' उपाय आहे.
आल्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता.
आल्यचं गुणधर्म गरम आहे. कच्च आलं भाजून खाल्यास खोकला झटपट दूर होतो.
खोकला घालवण्यासाठी आल्याचा 'चहा' हा एक फायदेशीर उपाय ठरतो.
आल्याला वाळवून त्याची सुंठ बनवा. सुंठेला बरीक कुटून त्यात गुळ घाला. त्याचे लाडू तयार करा. हे लाडू खोकला घालवण्यासाठी मदत करतात.
ताज्या आल्याचा रस कढून घ्या. हा रस सकाळ-संध्याळ कमी प्रमाणात प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)