गायीचं की म्हैशीच... कोणतं तूप जास्त फायदेशीर?

Pooja Pawar
Oct 22,2024


अनेकजणांना जेवणावर तुपाची धार टाकली नाही तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतंच नाही. तुपाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक फायदे आहेत.


दुधापासून तूप तयार केलं जातं. अनेकजण गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे सेवन करतात तर काहीजण म्हैशीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे सेवन करतात.


गाय आणि म्हैस दोघांच्या दुधापासून तूप बनवण्याची पद्धत सारखीच आहे. पण दोन्हींचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत.


पौष्टिकतेबद्दल बोलायचे झाल्यास, गाईच्या तुपात 62 ते 65 टक्के सेचुरेट‍िड फॅट्स असतात, ज्यामध्ये शॉर्ट-चेन आणि मीडियम-चेन फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते.


गायीच्या तुपात A, D, E आणि K2 असे जीवनसत्व आढळतात. गायीच्या तुपात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत आणि आतड्यांसंबंधी आरोग्यास चांगले ठेवते.


म्हैशीचे तूप म्हशीच्या दुधापासून काढलेल्या मलई किंवा लोणीपासून बनवले जाते. या दुधात फॅट जास्त असते.


म्हैशीच्या तुपात साधारणतः 80 ते 85 टक्के सेचुरेट‍िड फॅट्स असतात, ज्यामुळे ते गायीच्या तुपापेक्षा जाड आणि समृद्ध असते.


म्हैशीच्या तुपात गायीच्या तुपाच्या तुलनेत व्हिटॅमिन ए चे प्रमाण कमी असते. म्हैशीच्या तुपात फॅट्स जास्त असतात त्यामुळे कॅलरीज जास्त असतात.


जर तुम्हाला जास्त कॅलरीजचे सेवन करायचे असेल तर म्हैशी तूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.


गायीच्या तुपाची चव ही सौम्य, खमंग आणि सुगंधी असते. हे गुण गायीच्या जातीनुसार आणि तिच्या आहारानुसार बदलू शकते.


म्हैशीचे तूप हे मलईदार असते तसेच गाईच्या तुपापेक्षा त्याची चव जास्त चांगली लागते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story