रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का?

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा

रोज ठराविक अंतर चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं.

हृदयविकाराचा झटक्याचा धोका कमी होतो

नियमित चालणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणं कमी असतं. तसेच त्यांचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

रोज 15 मिनिटं चाललं तरी

रोज 15 मिनिटं चाललं तर शरीरातील 100 ते 150 कॅलरी बर्न होतात. त्यामुळे शरीरातील फॅट्स आणि पर्यायाने वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते.

या समस्याही होतात दूर

चालल्याने एन्डोफ्रिन्सचा स्राव वाढतो. त्यामुळे आनंदी वाटतं आणि तणाव किंवा अस्वस्थतेसारख्या समस्या निर्माण होत नाहीत.

पाचनक्रिया सुधारते

रोज थोडं अंतर चालल्याने पाचनक्रिया सुधारते. म्हणजेच अपचन आणि पोटासंदर्भातील समस्या कमी होतात.

रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत

नियमितपणे चालणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत असते. त्यांना सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन लवकर होत नाही.

काही मिनिटं चाललं तरी...

काही मिनिटं चाललं तरी शरीराला नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि पेशांनी तसेच मेंदूला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होतो.

मानसिक आरोग्यासाठी फायदा

चालल्याने मानसिक शांततेबरोबरच बुद्धी तल्लख राहण्यास आणि मन एकाग्र करण्यासही मदत होते.

झोपेवर सकारात्मक परिणाम

नियमितपणे चालल्याने चांगली झोप लागते. नियमित चालणाऱ्या व्यक्ती लवकर झोपी जातात. नियमित चालल्याने गाढ झोप लागते.

सांध्यांना फायदा

सांधे सुदृढ राहण्यासाठीही नियमित चालणं फायद्याचं ठरतं. यामुळे स्नायूही बळकट होतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story