बदललेली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
पांढऱ्या साखरेला गूळ हा आरोग्यदायी पर्याय असला तरी त्याचे सेवन करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
गुळामध्ये फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. याशिवाय अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजेही यामध्ये आढळतात.
हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि शरीर उबदार राहतं.
डायबिटीस रुग्ण हे गुळाचा चहा पिऊ शकतात मात्र त्याचं प्रमाण हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवायला हवं.
साखरेपेक्षा गूळ आरोग्यदायी असला तरी त्याच्यामुळे देखील रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.
तेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर गुळाचा चहा मर्यादित प्रमाणातच पिण्याचा प्रयत्न करा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)