बहुविध प्रकारच्या कापडांमध्ये अनेकांच्या आवडीचं कापड म्हणजे वेल्वेट. हे एक असं तापड आहे ज्यामध्ये एक पाईलचा थर असतो. हा थर सहसा सूती धारे, रेशम किंवा लोकरीपासून तयार केला जातो.
अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की वेल्वेट हे किड्यांच्या रक्तापासून तयार करतात. प्रत्यक्षात मात्र तसं नाहीय.
हे कापड पूर्णपणे मानवनिर्मित असून, त्यामध्ये रेशमी धागे, सूती धागे, रेयॉन किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर होतो.
वेल्वेट सिल्कचं असल्यास त्यात रेशमी धाग्यांचा वापर केला जातो. रेशमाचे धागे, Silkworm पासून मिळवले जातात. या प्रक्रियेमध्ये या किड्यांना मारलं जातं.
इतर सर्व प्रकारचे वेल्वेट हे कृत्रिम धाग्यांपासून अथवा सूती धाग्यापासूनही तयार केलं जातं. इथं कुठंही किड्यांचा किंवा अन्य कोणत्याही प्राणी, किटकाचा वापर होत नाही.
पॉलिस्टर आणि रेयॉन वेल्वेट हे पूर्ण पद्धतीने क्रुअल्टी फ्री कापड असतं.