पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.
मात्र पाणी योग्य प्रकारे प्यायलं गेलं नाही तर त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अनेकजणांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे कोणते तोटे होऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात.
उभं राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीची समस्या वाढते. उभे राहिल्याने मज्जातंतूंमध्ये तणाव निर्माण होतो आणि यावेळी पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव संतुलनावर परिणाम होतो.
फुफ्फुसांशी संबंधित समस्या असल्यास उभं राहून पाणी पिणं टाळावं. असं म्हटलं जातं की, उभं राहून पाणी पिताना ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो त्यामुळे फुफ्फुसांपासून हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उभ्याने पाणी प्यायल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने खाली जाते आणि पोटाच्या खालच्या भागात पोहोचते.
उभं राहून प्यायल्याने अनेकदा तहान भागत नाही. तेव्हा तहान लागल्यास खाली बसून पाणी प्यावे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)