24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे.
या मेगा ऑस्कनपूर्वी प्रत्येक संघांनी काही खेळाडूंना रिटेन केले असून यात तीन खेळाडूंना 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आले आहे.
जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सने 18 कोटींना रिटेन केलेलं आहे. MI ने रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी बुमराह हा सर्वात महागडा खेळाडू आहे.
CSK ने ऋतुराज गायकवाड याला 18 कोटींना रिटेन केलं आहे. कॅप्टन ऋतुराज हा CSK ने रिटेन केलेला महागडा खेळाडू आहे.
ऑल राउंडर रवींद्र जडेजाला सुद्धा CSKने 18 कोटींना रिटेन केलं. जडेजा हा CSK ने रिटेन केलेला दुसरा महागडा खेळाडू आहे.
पॅट कमिन्सला सनरायजर्स हैदराबादने 20.5 कोटींना रिटेन केलं आहे. कमिन्सच्या नेतृत्वात SRH ने गेल्यावर्षी फायनलमध्ये धडक दिली होती.
गुजरात टायटन्सने अफगाणिस्तानचा ऑल राउंडर राशिद खान याला 18 कोटींना रिटेन केलं आहे.
राजस्थान रॉयल्सने कॅप्टन संजू सॅमसन याला आयपीएल 2025 साठी 18 कोटींना रिटेन केलं आहे. मागच्या सीजनच्या तुलनेत त्याच्या वेतनात 4 कोटींची वाढ झाली आहे.
युवा क्रिकेटर यशस्वी जयस्वाल याला सुद्धा राजस्थान रॉयल्सने 18 कोटींना रिटेन केलं आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सने निकोलस पुरन याला 21 कोटींना रिटेन केलं असून तो टीमचा विकेटकिपर आणि फलंदाज आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराट कोहलीला 21 कोटींना रिटेन केलं आहे. विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये RCB चं नेतृत्व करेल अशी चर्चा आहे.
हेन्रीचं क्लासेन याला सनरायजर्स हैदराबादने तब्बल 23 कोटींना रिटेन केलं असून हा मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन झालेला क्लासेन हा सर्वात महागडा खेळाडू आहे.