फोनवर कव्हर का लावू नये?

आजकाल स्मार्ट फोन सर्वांकडेच असतात. हे फोन महाग असल्याने त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काहीजण फोनवर कव्हर लावतात.

पण अनेकांना माहित नसेल की, फोन कव्हर लावल्याने मोबाईलचे नुकसान होऊ शकते.

फोनवर कव्हर लावल्याने यामध्ये हीटिंगची समस्या निर्माण होऊ शकते. फोन गरम झाल्याने हँग होऊ शकतो त्यामुळे वापरताना अडचणी येतात.

फोनवर कव्हर लावल्याने चार्जिंगच्या समस्या निर्माण होतात. फोन गरम झाल्याने तो अनेकदा नीट चार्ज होत नाही.

फोनसाठी चांगल्या क्वालिटीचा कव्हर वापरला नाही तर त्यावर बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो.

फोन कव्हर जर मॅग्नेटिक असेल तर जीपीएस आणि Compass वापरताना ही समस्या निर्माण होऊ शकते.

जर फोन कव्हर लावायचाच असेल तर चार्जिंग करताना तो काढून ठेवा. अन्यथा मोबाईल गरम होऊन ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story