गजर लावून उठण्याने लोकांच्या स्वास्थ्यावर गंभीर परिणाम दिसू शकतात. अलार्म तुमच्या झोपेच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणू शकतात ज्यामुळे दिवसभर सुस्ती जाणवू शकते.
अलार्मचा मोठा आवाज अचानक कानात जातो आणि त्यामुळे तणावाची पातळी वाढू शकते.
अचानक उठल्याने हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे हृदयसंबंधी समस्यांचा धोका वाढतो.
अलार्ममुळे जाग आल्यानंतर अनेकदा थकवा आणि चिडचिड जाणवते.
झोपेतून उठल्यानंतर, शरीराला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, कारण अलार्मचा आवाज आपल्याला सतर्क ठेवतो.
उलटपक्षी गजर न लावता उठल्याने दिवसभर उत्साह आणि मन प्रसन्न राहतं.
सूर्याच्या प्रकाशात झोपेतून उठणं शरीरासाठी फायदेशीर असतं यामुळे लवकर उठण्यास मदत होते.
रात्री वेळेवर झोपल्याने सकाळी लवकर म्हणजेच वेळेवर उठता येते. यासाठी रात्री लवकर झोपायला हवे.
तणावमुक्त आणि निरोगी दिनचर्येसाठी हळू-हळू सकाळी अलार्म न लावता उठण्याची सवय लावा.