हे 7 प्रकारचे चीज तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

सगळ्याच प्रकारचे चीज तयार करण्यासाठी समान सामग्रीचा वापर केला जात नाही. पण तुम्हाला हे आरोग्यासाठीचे चीजचे फायदे माहित आहेत का ?

जास्त पोषक आणि कमी चरबी असलेले चीज खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

फेटा चीज

फेटा चीज हे अर्ध मऊ बनवलेले ग्रीक चीज आहे. या चीजमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते, त्यातील बी व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि फॅास्फरस आतडे आणि हाडांच्या आरोग्यास नियंत्रित ठेवू शकते.

परमेसन चीज

परमेसन हा इटालियन जुना प्रकारचा चीज आहे ज्यामध्ये प्रथिने जास्त असल्याने पचायला सोपे आणि हाडांची ताकद वाढवण्यास मदत करतात.

मोझरेला चीज

मोझरेला हे इटलीतील मऊ आणि चव असलेला चीज आहे. यात सोडियम, कॅलरी आणि चरबी कमी प्रमाणात असते, इतर चीजप्रमाणे त्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि फॅास्फरस जे आतडे आणि शरीराचे आरोग्य नियंत्रित ठेवतात.

ब्लू चीज

ब्लू चीज त्याच्या वेगळ्या चवीने आणि त्याला असलेले निळ्या हिरव्या डागेने ओळखतात. हे चीज प्राणांच्या दुधापासून बनवले जाते. त्यात कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते आणि सोडियमचेही प्रमाण जास्त असल्याने याचे सेवन कमी करावे.

गोट चीज

गाईच्या दुधाचे चीज तुलनेत बकरीचे चीज पचायला सोपे जाते. यात लॅक्टोजचे प्रमाण कमी असते, कॅल्शिअम ए आणि रोगप्रतिकारक आरोग्यास फायदा देते.

रिकोटा चीज

रिकोटा हे इटालियन डायट चीज आहे. यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. Whey पासून बनवल्याने त्यात कमी चरबी असल्यामुळे स्नायू आणि हाडांच्या आरोग्यास मदत करते.

मँचेगो चीज

मँचेगो हे मेंढीच्या दुधापासून बनवलेले स्पॅनिश चीज आहे. त्यात प्रोटीन, कॅल्शियम ए, डी आणि ई जास्त प्रमाण असते.

VIEW ALL

Read Next Story