तुम्ही रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेताय? मग सावध व्हा!

कॅल्शियम शरीरासाठी फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात.

पण रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया

अनेकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. ती कमतरता भरून निघण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्यांचा वापर करतात.

पण डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कॅल्शियमच्या जास्त गोळ्या घेतल्यामुळे किडनी स्टोनचा किंवा त्यासंबंधीत त्रास होऊ शकतो.

कॅल्शियमच्या जास्त गोळ्या घेतल्याने गॅस, बद्धकोष्ठता, ओटी पोटात गोळा येणे यासारखे त्रास होऊ शकतात.

तुम्हाला जर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढायाची असेल तर कॅल्शियमने समृद्ध असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर असेल.

शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दूध, दही आणि पनीर अशा पदार्थांचे सेवन करू शकता.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story