जास्त गरम चहा प्यायल्यानं ओठांचा रंग बदलू शकतो. जे सिगारेट ओढल्यामुळेही होताना दिसते.
दुधासोबत चहा प्यायल्यानं हृदयाचे ठोके वाढणे, स्ट्रेस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जास्त चहा पिऊ नये.
दुधाच्या चहाच्या ऐवजी काळा चहा आणि कमी साखर असलेला किंवा साखर नसलेला चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो.
चहाच्या प्यायल्यानं रंग बदलो हे चुकीचं आहे त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
चहा प्यायल्यानं रंग काळवंडतो असे म्हणत असले तरी त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये चहा त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.
अनुवांशिक घटकांव्यतिरिक्त, त्वचेचा रंग हा आपण सूर्यप्रकाशात किती वेळ घालवतो यावर देखील अवलंबून असतो.
खाण्याच्या सवयींचाही त्वचेच्या रंगावर परिणाम होतो. पण, त्याचा परिणाम इतका होत नाही की तुम्ही गोरे दिसायला लागाल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)