लग्न समारंभ असेल तर हातावर मेंदीही आवर्जुन काढतात. नववधुच्या हातावरील मेंदीतर सगळ्यांच चर्चेचा विषय असते
हातावरील मेंदीला अधिक गडद रंग यावा यासाठी हल्ली केमिकल वापरतात
मात्र आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. त्या वापरुन हातावरील मेंदीचा रंग गडद होईल
निलगिरीच्या तेलामुळं मेंदीचा रंग गडद होईल. यासाठी मेंदी सुकल्यानंतर न पाणी वापरता काढा आणि त्यानंतर निलगिरीचे तेल लावा
देशी तुपामुळं मेंदीचा रंग अधिक खुलून येईल. मेंदी सुकल्यानंतर पाणी न वापरता काढा आणि दोन्ही हातांना तूप लावा
मेंदी सुकल्यानंतर त्यावर बाम चोळा आणि अर्धा तास तरी ठेवा.
तव्यावर लवंग भाजून घ्या आणि त्यातून येणारा धूर हातावर शेकून घ्या. त्यानंतर हाताला खोबरेल तेल लावा