50 व्या वर्षीही तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाहीत सुरकुत्या, रोज प्या हे ड्रिंक
वाढत्या वयाबरोबर चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. अशा स्थितीत महिला विविध प्रकारचे उत्पादने वापरतात.
पण तुम्ही रोज आहारात अँटी एजिंग ज्यूसचा समावेश केल्यास तुम्हाला नैसर्गिक फायदा होतो.
या ज्यूसमुळे त्वचेच्या सुरकुत्या आणि हलकेपणा कमी करण्यास मदत करतो.
हा अँटी एजिंग ज्यूस कसा बनवायचा जाणून घ्या.
साहित्य - एक छोटा आवळा, 1 कप डाळिंब, 1 कप काळी द्राक्षे, चाट मसाला आणि चव वाढवण्यासाठी काळे मीठ लागणार आहेत.
सर्व फळं नीट धुवून एकत्र ब्लेंडरमध्ये बारीक करा.
डाळिंबामुळे अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि ई, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असतं.
काळे द्राक्ष रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि रक्तदाब कमी करण्यासाठी फायदा मिळतो.
त्वचेला नवीन जीवन देण्यासाठी आवळा हा फायदेशीर मानला जातो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)