6 गोष्टी ज्या पालकांनी मुलांसोबत रात्री जेवताना कराव्यात

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 06,2024

आपल्या आजूबाजूला आता छोटं कुटूंब पाहायला मिळतं. ज्यामध्ये आई बाबा आणि मुलं एवढीच लोकं असतात.

पालक दोघंही कामाला जात असल्यामुळे मुलं दिवसभर पाळणाघरात किंवा आजी-आजोबांकडे असतात.

अशावेळी पालकांशी संवाद कमी होतो. रात्रीच्या जेवणालाच पालक आणि मुलं एकत्र असतात.

पालकांनी न चुकता मुलांसोबत या 6 गोष्टी चर्चा कराव्यात.

मी अगोदरच तुझ्या कोणत्याही मागणीला 'हो' म्हटलं तर ती मागणी काय असेल?

यावरुन तुम्हाला मुलांच्या मनात काय चाललंय हे कळेल?

आज नवीन काय शिकलात? या प्रश्नामुळे मुलांचे माईंड डव्हेल्प करण्यासाठी मदत होईल. यामुळे आपण नवीन काय शिकतो हे लक्षात ठेवेल.

आज काय चुकलं? यामुळे मुलाच्या मनात भिती निर्माण होणार नाही. आणि तो तुमच्याशी अतिशय मोकळेपणाने बोलेल.

कुणाला चांगल काम करताना पाहिलं? यामुळे मुलाचे निरिक्षण क्षमता वाढेल. यामुळे मुलामध्ये मदत करण्याचा विचार रुजवला जाईल.

तुझ्याकडे सुपरपावर असेल तर तू काय करशील? या प्रश्नामुळे मुलं तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. त्याच्या मनातील विचार तुम्हाला कळतील.

दिवसभरातील कोणत्या गोष्टीने आनंद झाला? यामुळे मुलं तुमच्याशी आनंदाच्या गोष्टी देखील शेअर करेल.

मुलांसोबत स्ट्राँग बॉडिंग निर्माण करण्यासाठी हे 6 प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरतात.

VIEW ALL

Read Next Story