डायबेटिज झाल्यावर डोळ्यांमध्ये दिसून येतात 5 लक्षण, दुर्लक्ष करू नका

डायबेटिज ही जगभरातील एक वाढती आरोग्यविषयक समस्या आहे. डायबेटिजवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

सध्याच्या लाइफस्टाइलमुळे वयोवृद्धच नाही तर तरुणांना सुद्धा डायबेटिज हा आजार होत आहे.

डायबेटिजची सुरुवात झाल्यावर डोळ्यांमध्ये काही लक्षण जाणवतात. या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडून उपचार घेणे गरजेचे ठरते.

धुरकट दिसणे :

डायबेटिजच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये याचा समावेश आहे. अचानकपणे तुम्हाला डोळ्यांनी धुरकट दिसू लागते. डायबेटिजची सुरुवात असताना रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने डोळ्यांच्या लेन्सला सूज येते ज्यामुळे तुम्हाला धुरकट दिसू लागते.

डोळे दुखणे :

डायबेटिजमुळे डोळ्यांवर प्रभाव पडतो, ज्यामुळे डोळ्यांमध्ये वेदना होतात. जर तुम्हाला डोळ्यांमध्ये वेदना होत असतील तर हा डायबेटिज वाढल्याचा संकेत आहे.

डोळ्याला सूज येणे :

डायबेटिजमुळे डोळ्यांच्या चारही बाजूंना सूज येते. डोळ्यांना तेव्हा सूज येते जेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढते. यामुळे डोळ्यांच्या सेल्सवर प्रभाव पडतो. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

रात्रीचं कमी दिसतं :

डायबेटिज झाल्यावर डोळ्यांच्या दृष्टीवर सुद्धा परिणाम होतो. डायबेटिज वाढल्याने डोळ्यांच्या नसांवर ताण येतो परिणामी रात्रीचं दिसणं कमी होतं.

दृष्टीत अचानक बदल :

डायबेटिजमुळे डोळ्यांच्या दृष्टीमध्ये अचानक बदल होऊ शकतात. जर तुमची दृष्टी कमजोर झाली असेल किंवा डोळ्यांसमोर फ्लोटर्स दिसू लागले तर ते डायबेटिक रेटिनोपॅथीचे लक्षण असू शकते.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story