जर वेळेवर तुमची मासिकपाळी येत नाही किंवा मिस होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे PCOD किंवा PCOS ची समस्या होऊ शकते.
मासिकपाळीच्या काळात जर खूप त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुम्हाला एन्डोमीट्रियोसिस हा आजार होण्याची शक्यता असते.
मासिकपाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही लगेच युट्रसचं अल्ट्रालाऊंड करून घ्या.
जर काही न खाता तुमचं वजन वाढत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला थायरॉईड किंवा PCOD ची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांची भेट घ्या.
सर्वसाधारपणे मासिकपाळी सुरु असताना मुलींच्या ब्रेस्टमध्ये दु:खतं. पण त्यानंतर जर कधी ब्रेस्टमध्ये दु:ख असेल किंवा गाठ असल्याचं जाणवत असेल तर लगेच डॉक्टांराची भेट घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)