Swapna Shastra: स्वप्नात हत्ती दिसणं शुभ की अशुभ?

आपल्याला बऱ्याच प्रकारची स्वप्न पडतात जे आपल भविष्य दर्शवणारं असतं. पण तुम्हाला माहित आहे का स्वप्नामध्ये हत्ती दिसणं शुभ असतं की अशुभ?

हिंदू धर्मानुसार हत्ती हे शुभ, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं शुभ असतं.

अनेकदा आपल्याला स्वप्नामध्ये हत्ती दिसतो.स्वप्नशास्त्रानुसार , जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पांढरा हत्ती दिसला तर घरात लवकरच सुखाचे आगमन होणार असल्याचे संकेत मानलं जातं.

जर तुम्हाला स्वप्नात हत्ती हल्ला करताना दिसत असेल तर तुमच्यावर लवकरच संकट येणार आहे याचे चिन्ह समजले जाते.

स्वप्नामध्ये हत्तीचा कळप दिसणं शुभ मानलं जात. यामुळे आर्थिक भरभराच होणार आहे असे संकेत मिळते.

स्वप्नामध्ये हत्ती एकाच ठिकाणी उभा असलेला दिसल्यास तुमच्यावर कोणतंतरी संकट येणार असल्याचे सूचित करते.

जर एखाद्या गर्भवती महिलेला स्वप्नात हत्ती दिसला तर ते भाग्यवान मुलाचे आगमन होणार असल्याचे शुभ चिन्ह असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story