सिझन सुरू झाल्यानंतर मोठ्या आवडीने आंबा खाल्ला जातो
मात्र, आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा तब्येत बिघडू शकते.
आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही दही खावू नका. यामुळं सर्दी आणि अॅलर्जी होऊ शकते.
लिंबू आणि संत्री या पदार्थांमुळं तुमच्या शरीराचे पीएच संतुलन बिघडु शकते.
आंबा खाल्ल्यानंतर लगेचच मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
आंबा खाताना किंवा खाल्ल्यानंतर तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारलं खाणार असाल तर थांबा. हे दोन पदार्थ एकत्र मिसळले तर मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
आंबा खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नये. कारण यामुळे पोटदुखी होऊ शकते. किमान 30 मिनिटांनंतरच पाणी प्या
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)