घाम किंवा दुर्गंधी दूर करण्यासाठी परफ्यूम ही उपयुक्त गोष्ट असते.
परफ्यूम लावल्याने तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि फ्रेश वाटते.
परफ्यूम लावण्याची एक विशिष्ट पद्धत असते. याच्या काही सोप्या टीप्स आपण जाणून घेणार आहोत.
नैसर्गिक वासाचे परफ्यूम घेण्याला प्राधान्य द्या. नैसर्गिक परफ्यूम कपड्यांमध्ये जास्त वेळ टिकतात.
अंघोळ केल्यानंतर त्वचा मॉश्चरायईज होते. त्यामुळे त्यानंतर लगेचच परफ्यूम लावा.
परफ्यूम लावताना मान, मनगट, खांदा, कोपर आणि पोटाच्या बेंबीजवळ स्प्रे करा. या ठिकाणी परफ्यूम लावल्याने सुगंध बराच काळ शरीरात राहतो.
जर तुम्ही रात्री बाहेर जात असाल किंवा डेटवर जात असाल तर गळ्यावर परफ्यूम लावा.
तुमच्या केसांना बराच काळ चांगला वास येण्यासाठी केसांवर परफ्यूम लावा. ते लावण्यासाठी तुम्ही कंगवा किंवा ब्रशवर परफ्यूम लावून केसांवर कंगवा फिरवू शकता.
तसेच काही जण कानामागे परफ्यूम लावतात. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते.