टोमॅटो महागले आहेत. पण तुम्ही घरातही टोमॅटोची लागवड करु शकता
घरात टोमॅटोची लागवड करण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा
टोमॅटोचे रोप मध्यम आकाराच्या कुंडीत लावा. या कुंडीच्या तळाला छोटी छिद्र करायला विसरु नका
माती टाकण्यापूर्वी कुंडीत विटा किंवा खापरांचे तुकडे ठेवा म्हणजे माती वाहून जाणार नाही
टोमॅटोसाठी माती घेताना त्यात 10 टक्के कोकोपीट, 20 टक्के वाळू, 20 टक्के कंपोस्ट खत आणि 50 टक्के माती असं प्रमाण ठेवा
नर्सरीतील जाऊन टोमॅटोचे रोप आणल्यास कमी वेळातच रोप वाढेल
केळीचे साल 1-2 दिवस पाण्यात भिजत ठेवावे नंतर ते गाळून ते पाणी रोपाला द्यावे. हे खत खूप उपयोगी ठरते
रोप लावल्यानंतर 10-15 दिवस प्रखर सूर्यप्रकाशात ठेवा. तसंच, खूप पाणी टाकू नका