उकाडा वाढला, की अनेकदा पदार्थ थंड ठेवण्यासाठी म्हणून बर्फाचा वापर केला जातो.
तुम्ही कधी विचार केला आहे का, की हा बर्फ पाण्यावर तरंगतो, पण मद्याच्या ग्लासात का तरंगत नाही?
भौतिकशास्त्रात याचं अचूक उत्तर मिळतं. घनतेच्या नियमावर आधारित गुणधर्मांमुळं हे घडतं.
एखाद्या पदार्थाची घनता द्रवाहून जास्त असेल तो पदार्थ त्या द्रवात बुडतो आणि जर हाच पदार्थ वजनानं हलका असेल तर तो तरंगतो.
बर्फाची घनता पाण्याहून कमी असते. तर, मद्याहून जास्त असते. ज्या कारणामुळं बर्फाचा तुकडा पाण्यावर तरंगतो.
मद्याहून बर्फाची घनता जास्त असल्यामुळं तो प्याल्यामध्ये चटकन बुडतो.