'टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली...' युवराजने केली मोठी भविष्यवाणी

Published by: Zee Team | Jun 03, 2024

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीवर सर्वांचा नजरा असणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात कोहली खेळू शकला नव्हता.

Published by: Zee Team | Jun 03, 2024

टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीसंदर्भात टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Published by: Zee Team | Jun 03, 2024

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल, असं भाकित युवराज सिंगने वर्तवलं आहे.

Published by: Zee Team | Jun 03, 2024

विराट कोहलीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या सध्याचा फॉर्म बघता टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहिल असं युवराजने म्हटलं आहे.

Published by: Zee Team | Jun 03, 2024

टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताबरोबरच वेस्टइंडिज किंवा पाकिस्तानचा संघ खेळेल असं भाकितही युवराजने वर्तवलं आहे.

Published by: Zee Team | Jun 03, 2024

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात किंग कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने 25 डावात 131.30 च्या स्ट्राईक रेटने 1141 धावा केल्या आहेत.

Published by: Zee Team | Jun 03, 2024

VIEW ALL

Read Next Story