गुरूपौर्णिमेला तुमच्या गुरूंना द्या 'या' खास भेटवस्तू

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान हे उच्च आणि महत्वपूर्ण आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा.व्यासमुनींना गुरूंचे गुरू मानलं जात असे. त्यामुळे या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

आपल्या आईनंतर आपल्या आयुष्यात गुरुरूपात अनेक व्यक्ती येतात जे आपल्याला भरभरून ज्ञान देऊन जातात. जर तुम्हालासुद्धा यावर्षी गुरूपौर्णिमेला खास भेटवस्तू द्यायची असेल तर या वस्तू नक्की ट्राय करा.

पुष्पगुच्छ

फुलं नेहमीच प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखले जातात. आपण आपल्या गुरूजनांना पुष्पगुच्छ किंवा एखादं गुलाबाचं फुल भेट म्हणून देऊ शकतो.

डायरी

डायरीमध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या महत्वाच्या गोष्टींची नोंद करून ठेवू शकतो. काही वेळेस काहींना नित्यनियमाने डायरी लिहिण्याची सवय असते. त्यामुळे आपण डायरीसुद्धा भेट म्हणून देऊ शकतो.

स्मार्ट वॉच

संपूर्ण जग सध्या डिजिटल साधनांच्या वापरानं काम पूर्ण करतं. अशातच बजेटनुसार आणि आवडीनुसार स्मार्ट वॉच भेट म्हणून देखील निवडू शकता.

हॅण्डमेड वस्तू

प्रत्येक गुरूला आपल्या विद्यार्थ्याने केलेल्या कामाचं कौतुक असतं. जर तुम्ही तुमच्या गुरूंना हाताने बनवलेली वस्तू भेट म्हणून देण्याचे ठरवत असाल तर ही एक अप्रतिम भेट असेल .

मिठाई

एखाद्या व्यक्तीबद्दल आदरांजली व्यक्त करायची असेल तर मिठाईचा बॉक्स देण्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही. अगदी आधीपासून सामाजिक किंवा धार्मिक प्रसंगांसाठी गोड पदार्थ भेट म्हणून दिले जातात.

VIEW ALL

Read Next Story