हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात
शेवग्याच्या शेंगा व पाने याची देखील भाजी खूप गुणकारी आहे.
शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल गुण असतात. त्याचबरोबर फळात व्हिटॅमिन ए, आयर्न, मॅग्निशियम पोटेशियम आणि झिंकसारखे पोषकतत्वे असतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची भाजी खूप गुणकारी आहे. तसंच, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
हृदयाच्या आरोग्यासाठीही शेवगाच्या शेंगा खूप फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट गुण असतात.
अस्थमाच्या आजारावर ही शेंगा खूप उपयुक्त आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)