फक्त 1 पालेभाजी डायबेटिजसह 10 आजारांवर प्रभावी, जाणून घ्या फायदे

Pooja Pawar
Oct 11,2024


पालक ही अशी भाजी आहे जी फक्त चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.


ग्रेटर नोएडा येथील GIMS रुग्णालयात कार्यरत असणारे डाइटीशियन आयुषी यादवने सांगितले की नियमित पालकचे सेवन केल्याने आरोग्याला कसे फायदे मिळतात.

डायबेटिज नियंत्रण :

पालकाचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यात अल्फा-लिपोइक ऍसिड असते, जे इन्सुलिन सिक्रीशनला प्रोत्साहन देते.

एनर्जी :

पालकच्या भाजीत भरपूर फायबर, लोह आणि जीवनसत्वे आढळतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

डोळे :

पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि ल्युटीन सारखे विशेष पोषक असतात, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

हाडं मजबूत :

हाडं मजबूत : पालकमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात जे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांना प्रतिबंधित करतात.

आतडे निरोगी राहतात :

पालक हिरव्या भाज्यांमध्ये फायबर असते, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

त्वचा :

पालकमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात.

वजन नियंत्रणात राहते :

पालक भाजीमध्ये कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी पालकचे सेवन करावे.

हृदयाचे आरोग्य :

पालकमध्ये पोटॅशियम असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तणाव कमी होतो :

पालकमध्ये फोलेट असते, ज्याच्या सेवनाने नैराश्य आणि तणाव कमी होतो.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story