मिटक्या मारत लोणचं खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

काही जणांना जेवणात किंवा पराठ्यांबरोबर लोणचं खायची सवय असते. पण रोज लोणचं खाणं आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकते.

लोणच्यामध्ये सोडियम म्हणजेच मीठाचे प्रमाण खूप जास्त असते.

यामुळं शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्याची प्रक्रिया नीट पार पडत नाही.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडं कमजोर होतात त्यामुळं सांधेदुखी वाढते. अर्थरायटिसमध्ये लोणचं न खाण्याचा सल्ला दिला जातो

लोणचं बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळं पोटासंबंधित विकार होऊ शकतात.

अॅसिडीटी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अतिप्रमाणात लोणचं खाल्ल्याने पोटात अल्सर होण्याचा धोका उद्भवू शकतो. शरीरात सूज आणि वेदना जाणवू शकतात.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही

VIEW ALL

Read Next Story