जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खाल्ली जाते.
पण जेवणानंतर बडीशेप खावी की नाही? जाणून घ्या
बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न हे घटक बडिशेपमध्ये असतात
म्हणूनच जेवणानंतर न चुकता बडिशेप खायला हवी. मात्र ती प्रमाणातच खावी
जेवणानंतर बडिशेप खाल्ल्याने अजीर्ण होत नाही. तसंच, मळमळ होत असेल तरी थांबते
बडीशेप खाल्ल्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. त्यामुळं गंभीर आजार टाळता येतात
बडिशेपमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्समुळं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळं वजन कमी होण्यासही मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)