पूर्वी केवळ वयस्कर लोकांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची समस्या आता अगदी तरुणांमध्येही दिसू लागली आहे. हार्ट अटॅक हा आता केवळ वयस्कर लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
मागील काही काळापासून तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.
मात्र तरुणाईमध्ये अचानक हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलं आहे? यामागे कोणती पाच प्रमुख कारणं आहेत जाणून घेऊयात...
धूम्रपान, सिगारेट आणि मद्याचं व्यसन असणे हे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.
जंक फूड खाणाऱ्या तरुणीचं प्रमाण वाढलं असून त्यामुळेही कमी वयात हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते.
कंप्युटर आणि स्मार्टफोनचा अति वापराचाही संबंध हल्ली कमी वयात हार्ट अटॅक येण्याची जोडला जातो.
दिर्घकाळ एखादी व्यक्ती तणावात असेल तरी त्याला असलेला हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो.
व्यायाम टाळणे किंवा काहीच व्यायम न करणे सुद्धा हार्ट अटॅकला कारणीभूत ठरु शकतं.
उच्च रक्तदाबाची समस्या असली तरी हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. यासाठी वय हा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरत नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)