विमानात यात्रेकरूंच्या सुविधेसाठी शौचालय सुद्धा असतं. फ्रेश होण्यासाठी प्रवासी विमानात त्याचा वापर करतात.
अनेक लोकांना प्रश्न पडतो की विमानाच्या शौचालयातील मलमूत्राचं नेमकं काय होतं. तेव्हा याविषयी जाणून घेऊयात.
घरांमध्ये असणाऱ्या शौचालयापेक्षा विमानातील शौचालय खूप वेगळी असतात. विमानातील शौचालयातून निघणारं मलमूत्राचा निचरा करण्यासाठी एक यंत्रणा डिझाईन करण्यात आलेली आहे.
विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विमानात केला जातो.
विमानातील प्रवाशांसाठी केलेली एक प्रमुख यंत्रणा म्हणजे विमानात वापरण्यात येणारं व्हॅक्यूम टॉयलेट.
व्हॅक्यूम टॉयलेट यंत्रणेची विशेषबाब म्हणजे हे पाणी आणि कठीण मल वेगळे करून स्वतंत्रपणे त्याची विल्हेवाट लावते.
यामुळे शौचालयातील हवा खेचली जाऊन तिला सील केले जाते, ज्यामुळे दुर्गंधी बाहेरच्या हवेत पसरत नाही.
विमानात असलेल्या शौचालयातील मल सॅनिटायझिंग लिक्विडमध्ये मिसळून त्याचे 'ब्लू आइस' मध्ये रूपांतर केले जाते, ही एक सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे.
'ब्लू आइस'मध्ये रूपांतर होताच कचरा थंड होतो आणि त्यामुळे तो ते कोणत्याही प्रकारच्या जीवाणू किंवा इतर हानिकारक बॅक्टेरियांपासून मुक्त होते.
विमान एअरपोर्टवर उतरल्यावर एक विशेष ट्रक येऊन सर्व शौचालयातील कचरा गोळा केला जातो. मग त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाते.