कपडे, सॅंडल खरेदीसाठी तुम्ही कधी ना कधी झुडीओला नक्की गेला असाल.
झुडीओ इतरांपेक्षा कमी किंमतीत कपडे विकतो. पण त्यांना कसं परवडतं?
झुडीओ ही टाटा ग्रुपची कंपनी Trent.Ltd चा एक भाग आहे.
इतर कंपन्या ड्रेसच्या डिझाइनसाठी लाखो रुपये खर्च करतात. इतर खर्च जोडून वस्तूंची किंमत जोडली जाते. पण झुडीओची स्ट्रॅटर्जी थोडी वेगळी आहे.
झुडीओकडे इन हाऊस फॅशन टीम आहे.ज्यामुळे त्यांचा डिझायनिंग खर्च नसण्यासारखाच आहे.
ते नव्या डिझाइनसह मार्केटमधील आधीचे डिझाइन्सदेखील कॉपी करतात, ज्यामुळे खर्च आणखी कमी होतो.
झुडीओ बल्कमध्ये प्रोडक्ट बनवतात. त्यामुळे बनवण्याचा खर्च वाचतो. त्यामुळे ते कमी किंमतीत वस्तू विकू शकतात.
आपल्या स्टोअरसाठी मॉल किंवा कोणत्या कॉम्प्लॅक्सची जागा निवडतात.जिथे लोकांची येजा होत असते.असे केल्याने लोकांचे लक्ष झुडीओवर जाते.
कमी किंमतीत चांगल्या वस्तू मिळाल्याने त्यांची माऊथ पब्लिसिटी होते.