फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?

Sep 02,2024


सध्या मोबाईल फोन ही काळाची गरज बनली असून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण हे फोनचा वापर करतात.


सोशल मीडियाचा वापर वाढल्याने तासंतास फोन वापरला जातो. रात्रीच्यावेळी सुद्धा बराचवेळ मोबाईलवर वेळ घालवल्याने झोपेची समस्या उद्भवते.


अनेकजण रात्रीच्या वेळी फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेऊन झोपतात मात्र यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.


फोनमधून निघणारे रेडिएशन्स हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात असं World Health Organisation च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.


फोन सतत जवळ ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे डोकेदुखी, प्रजनन क्षमता, स्नायू दुखी इत्यादी त्रास जाणवू शकतात.


फोनमधून निघणाऱ्या प्रकाश किरणांचा प्रभाव हा डोळ्यांवर पडतो ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते.


रात्री झोपताना फोन स्वतःपासून 3 ते 4 फूट लांब ठेवावा. फोन उशीजवळ किंवा उशी खाली ठेवल्याने तेथे उष्णता निर्माण होऊन आग लागण्याची सुद्धा भीती असते. तसेच रात्रीच्या वेळी फोन चार्जिंगला लावून झोपू नये.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story