गणेशोत्सवातील सिद्धीविनायक मंदिराच्या दर्शनाचे मार्ग; नेमका कोणत्या प्रवेशद्वारातून मिळेल प्रवेश...

Sep 03,2024


दक्षिण मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे.


यंदा गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा केला जाणार आहे.


सिद्धीविनायक मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दरम्यान अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.


बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात अलोट गर्दी होते. म्हणूनच दर्शनाचे सुलभ मार्ग कोणते हे जाणून घ्या.


सिद्धीविनायक मंदिरातील दर्शनाची वेळ सकाळी 5:30 ते रात्री 9:50 पर्यंत असते. मंगळवारी मंदिरात विशेष गर्दी असते.


मंदिरात पोहचण्यासाठी आपण लोकल ट्रेन, बस किंवा टॅक्सीचा पर्याय निवडू शकतो. दादर स्टेशनला उतरून आपण टॅक्सीने प्रभादेवीला जाऊ शकतो किंवा पायी 15 मिनिटांत मंदिरात पोहोचू शकतो.


सिद्धीविनायक मंदिराचे 'सिद्धी द्वार' आणि 'रिद्धी द्वार' हे प्रमुख दोन मार्ग आहेत. सिद्धी द्वारातून मिळणारा प्रवेश मोफत आहे तर रिद्धी द्वारातून प्रवेश करायचा असेल तर शुल्क आकारलं जातं.


आपल्याला कमी वेळेत दर्शन घ्यायचं असेल तर आपण शुल्क भरून त्वरित दर्शन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे वृद्धांसाठी, विकलांग व्यक्तींसाठी आणि लहान बाळांसहित असणाऱ्या मातांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था आहे.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story