मधाचा वापर हा जेवण आणि औषधांमध्ये करण्यात येतो.
मध बनवण्यासाठी सगळ्यात आधी मधमाश्या या फुलांचा रस जमा करतात. हा रस जेव्हा त्यांच्या पोटात जातो तेव्हा ते साखरेसारखं गोडं होतं.
मधमाश्या या रसाचं जेव्हा साखरेत रुपांतर होतं त्यातील पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं ते पचवू शकत नाही.
त्यामुळे मधमाशा हे पाणी त्यांच्या पोळ्यात सोडतात.
मध खराब न होण्याचं कारण त्यातील पाण्याची कमी आणि हायड्रोजन पेरोक्साइड मोठ्या प्रमाणात असणं आहे.
1922 मध्ये वैज्ञानिकांनी मिस्त्रमध्ये तूतनखामेनच्या कबरमधून 3000 वर्ष जुनं मध काढलं होतं. ते मध हे खाण्या योग्य होतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)