बदाम हे अतिशय पौष्टिक असून त्यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे घटक आढळतात.
सध्या अनेकांना बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या जाणवते अशावेळी बदाम हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
मात्र बदामाचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. एका दिवसात खूप बदाम खाल्ल्याने पचनाच्या समस्या, वजन वाढणे, किडनी स्टोन इत्यादी समस्या जाणवू शकतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रौढ लोकं दिवसाला 20-25 बदाम खाऊ शकतात. तर मुलांसाठी ही मर्यादा 10 बदाम एवढी असू शकते.
बदाम खराब कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात राहते.
बदाम फक्त कोलेस्ट्रॉलचं नाही तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. बदामामध्ये कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे पोट जास्तकाळ भरल्यासारखं वाटतं.
बदामामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनास मदत करते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन आराम मिळतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)