वयानुसार किती पावलं चालणं फायदेशीर ?

बरेच लोक रात्रीचे किंवा दुपारचे जेवण झाल्यावर शतपावली करतात. जेवणानंतर चालणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.

चालणे हे मानसिक आरोग्यास उत्तम ठरते. तसेच उत्तम पचन आणि झोप अशा अनेक प्रकारांसाठी फायदेशीर आहे.

पण तुम्हाला हे माहित का ? व्यायाम असो किंवा चालणं हे वय लक्षात घेऊन केले पाहिजे. यासोबतच प्रत्येकाने वयानुसार चालण्याची आणि व्यायामाची वेळ ठरवावी.

सफदरजंग हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर दिपक सुमन यांच्या म्हणण्यानुसार 18 ते 40 वयोगटातील स्त्री पुरूषांनी दररोज 10 ते 12 हजार पावले चालली पाहिजेत.

40 ते 50 वयोगटातील व्यक्तींनी रोज 8 ते 10 हजार पावलं चालणं फायदेशीर ठरते.

तज्ज्ञांच्या मते ज्यांचे वय 50 ते 60 च्या दरम्यान आहे त्यांनी रोज 5 ते 7 हजार पावलं चालणं योग्य आहे.

60 ते 70 वयोगटातील व्यक्तींनी दररोज 5 हजार पावले चालावीत. चालताना जर थकवा जाणवत असेल तर थोडा वेळ आराम करून पुन्हा चालायला सुरूवात करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story