घरातील फ्रिज आणि भिंतीमध्ये नेमकं किती अंतर असावं?

फ्रिज

हल्ली स्वयंपाकघरात एका गोष्टीची जागा अगदी ठरलेली असते, घर नवं असो वा जुनं ही वस्तू घरात असतेच... आणि ती म्हणजे फ्रिज.

फ्रिजची जागा

सहसा स्वयंपाकघराच्या एखाद्या कोपऱ्यात फ्रिज ठेवला जातो, तर काही मंडळी त्याच्यासाठी घरातील एखादु दुसरी जागा शोधतात.

फ्रिज कुठेही ठेवावा?

फ्रिज घरात कुठेही ठेवा, पण तो ठेवताना भिंत आणि फ्रिजचा मागचा भाग यामध्ये नेमकं किती अंतर असावं याची माहिती तुम्हाला आहे का?

चूक टाळा

फ्रिज कधीच भिंतीलगत ठेवू नका असं सांगण्यात येतं. फ्रिज ठेवत असताना भिंतीपासून तो साधारण 6 ते 10 इंचांच्या अंतरावर ठेवावा.

लक्ष ठेवा...

फ्रिज ठेवत असताना तो घरातील हीटर किंवा इतर कोणत्याही उष्ण वस्तूपाशी ठेवला जात नाही याचीही काळजी घेतली जावी. उष्ण वस्तूच्या बाजूला फ्रिज ठेवल्यास त्याच्या तापमानात फरक पडून त्यात ठेवले जाणारे पदार्थ खराब होण्याची शक्यता अधिक असते.

धोका

अनेकदा एखाद्या उष्ण वस्तूच्या बाजूला फ्रिज ठेवल्यास त्याच्या आतील बाजूस बाष्प जमा होऊन त्या बाष्पाचाही बर्फ होतो आणि या सततच्या प्रक्रियेमुळं फ्रिज लवकर खराब होण्याचा धोका असतो.

VIEW ALL

Read Next Story