श्रेयसइतकं फिट राहायचं आहे? फॉलो करा त्याच्या रुटीनमधील 'या' 6 गोष्टी

श्रेयसच्या नेतृत्वाखाली गाठली अंतीम फेरी

आयपीएल 2024 च्या पर्वात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

कस लागणार

केकेआरसाठी यंदाचा अंतिम सामना हा आयपीएलमधील चौथा अंतिम सामना असून या सामन्यात श्रेयसबरोबरच त्याच्या टीमचाही कस लागणार आहे.

फिटनेस सर्वात जमेची बाजू

खरं तर कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीमध्ये त्याची फिटनेस हीच सर्वात मोठी जमेची बाजू असते. श्रेयसही याला अपवाद नाही.

सर्वात तंदरुस्त खेळाडूंपैकी एक

श्रेयस अय्यर हा भारतीय संघातील सर्वात तंदरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. श्रेयस त्याच्या फिटनेससंदर्भात फारच जागृक आहे.

ट्रेनिंगमध्ये या गोष्टींचा समावेश

श्रेयसच्या ट्रेनिंगमध्ये धावणे, पोहणे, वजन उचलणे, व्यायाम आणि दोरी उड्यांचा समावेश असतो.

नाचायला आवडतं

भारतीय क्रिकेट संघातील मोजक्या खेळाडूंना उत्तम डान्स करता येतो. त्यामध्ये श्रेयसही आहे. आपल्या ट्रेनिंगदरम्यानच श्रेयसला नाचायला आवडतं. याचाही त्याला फायदा होतो.

दिवसाची सुरुवात...

श्रेयस त्याच्या दिवसाची सुरुवात योगसाधनेनं करतो. यामुळे त्याला मानसिक शांतता लाभते.

मुलाखतीत श्रेयस म्हणाला...

केकेआरचा कर्णधार म्हणून दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने, इतरांना धोकादायक वाटणारे व्यायाम करायला आपल्याला आवडतं असं सांगितलेलं.

प्रोटीनयुक्त आहार

श्रेयस प्रोटीनयुक्त आहार घेतो. यामध्ये अंड्यांसहीत चिकन आणि तृणधान्याचा समावेश असतो.

जंक फूडपासून दूर

स्पर्धा सुरु असताना श्रेयस जंक फूडपासून दूर राहतो. त्यामुळे त्याच्या पचनशक्तीला चालना मिळते आणि तो अधिक काळ फ्रेश राहू शकतो.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढे जा

अर्थात हा श्रेयसचा डाइट आणि आवड-निवड असली तरी तुम्हालाही आरोग्यासंदर्भातील उद्देशांसाठी आहारात काही बदल करायचे असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

VIEW ALL

Read Next Story