झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा डॉक्टर 7 ते 9 तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात.
पण धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव यासारख्या अनेक कारणांनी झोप अपूर्ण राहते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.
काही लोकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते, तर काही लोकांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. मुळात या दोन्ही सवयी घातक आहेत.
प्रत्येक व्यक्तीने रात्री किती वाजता झोपावे आणि किती तास झोपावे? याविषयी आज आपण जाणून घेऊया.
वयानुसार प्रत्येक व्यक्तीचा झोपण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.
1 ते 2 वर्षांच्या लहान बाळांनी 12 ते 15 तास झोपणे आवश्यक आहे.
तर 3 ते 5 वर्षांच्या मुलांनी 10 ते 13 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनी 9 ते 12 तास झोपावे.
किशोरवयीन मुलांनी 8 ते 10 तास झोपणे गरजेचे आहे.
तरुणांनी 7 ते 9 तास झोपणे कधीही चांगले आहे.
तर वृद्ध व्यक्तींनी 7 ते 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे.