मीठ हे जेवणातील महत्वाचा घटक आहे. मात्र त्याच प्रमाण चुकल्यास पदार्थ बेचव होतो.
काहीवेळा जेवण बनवताना मिठाचा अंदाज चुकतो. रस्सा भाजीत मीठ जास्त झालं तर त्यात पाणी वाढवून चव बॅलेन्स करता येते.
पण सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा या संदर्भात शेफ पंकज भदौरिया यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
सुक्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्याची चव बॅलेन्स करण्यासाठी लिंबाचा रस कामी येतो. लिंबाचा रस मिसळून तुम्ही खारट भाजीत टाकू शकता.
सुक्या भाजीत मीठ जास्त झाल्यास तुम्ही त्यात दही मिसळून चव बॅलेन्स करू शकता.
खारट झालेल्या सुक्या भाजीत तुम्ही टोमॅटोचे चिरून घालू शकता अन्यथा तुम्ही अशा भाजीत टोमॅटोची प्युरी मिक्स करून टाकल्यास भाजीची चव बॅलेन्स होते.
सुकी भाजी जर खारट झाली असेल तर त्यात तुम्ही भाजलेले बेसन मिक्स करू शकता. या ट्रिकमुळे भाजीतला खारटपणा निघून जाईल आणि भाजी चविष्ट होईल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)