शहरात गॅस पाइपलाइन आली असली तरी अजूनही काही गावाकडे गॅस सिलेंडरचाच वापर केला जातो.
स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या सिलेंडर गॅसची ही एक्स्पायरी डेट असते. एका ठराविक तारखेनंतर तो मुदतबाह्य होतो.
तुम्ही सिलेंडर नीट निरखून पाहिला असाल तर त्यावर तीन पट्ट्या असतात. त्यावर A-23, B-24 किंवा C-25 सारखे नंबर लिहलेले असतात.
या नंबरवरुनच तुम्ही सिलेंडरच्या एक्सपायरी डेटची माहिती मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स नीट समजून घ्याव्या लागतील.
या क्रमांकांवरूनच ए-24 चा अर्थ असा आहे की सिलिंडर 2024 या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान एक्स्पायर होईल. डी-27 चा अर्थ असा की सिलिंडर 2027 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदतबाह्य होईल.
ए : जानेवारी ते मार्च बी : एप्रिल ते जून सी : जुलै ते सप्टेंबर डी : ऑक्टोबर ते डिसेंबर