जपानी खाद्य संस्कृतीमध्ये भात आणि भातापासून तयार करण्यात आलेले अनेक पदार्थ आवडीनं खाल्ले जातात. इथली मंडळी भाताची चव आणि चिकटपणा पसंत करतात.
जपानी लोक लहान, मोठ्या दाण्याचा तांदूळ वापरतात. भात बनवण्याआधी ते तांदूळ थंड पाण्यानं धुवून घेतात.
भातातून अतिरिक्त स्टार्च काढण्यासाठी तांदूळ इतका स्वच्छ केला जातो किंवा तसा सल्ला दिला जातो.
यानंतर तांदूळ 30 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. भात शिजवताना त्यामध्ये असणारं पाण्याचं प्रमाणही महत्त्वाचं. सहसा 1 कप तांदुळासाठी 1.2 कप पाण्याचा वापर केला जातो.
भात मध्यम आचेवर शिजवणं अपेक्षित असतं. यासाठी उकळ येताच आच कमी करून झाकण लावून 15 मिनिटं भात शिजवा. आता गॅस बंद करून 10 मिनिटं भात वाफेतच शिजूद्या.
10 मिनिटांनंतर भाताचं झाकण काढून तो मोकळा करा आणि थंड झाल्यानंतर हा भात सर्व्ह करा.