कित्येकदा वर्षानुवर्षे जुन्या साड्या अशाच ठेवल्या जातात. अशा साड्यांपासून तुम्ही छान होम डेकॉरच्या गोष्टी बनवू शकता.
सिल्क साड्यांच्या पदरावर नेहमी हेवी डिझाइन असते. या पदराला कापून तुम्ही फ्रेम तयार करून घेऊ शकता.
सिल्क आणि कॉटनच्या साडयांपासून तुम्ही सुंदर बेडशीट बनवू शकता. या चादरी घराला रॉयल लुक देतील.
तुम्ही सुंदर सिल्क आणि कॉटनच्या साडयांपासून छान कुशन किंवा पिलो कव्हर्स बनवू शकता. सुंदर प्रिंट्स आणि रंगीत कुशन घराला परिपूर्ण बनवतात.
डायनिंग किंवा सामान्य टेबलवर घालायला टेबल क्लॉथ बनवू शकता. यामुळे घराला नवी चमक येईल.
जुन्या साड्यांपासून तुम्ही सुंदर पडदे बनवू शकता. तुमच्या खिडकीची लांबी मोजा आणि त्याच बाजूला साडी कापून पडदा बनवा.